◼️ काव्यरंग :- विजयानंद

विजयानंद

नवरात्रीच्या नव ज्योतींनी उजळत
विजयादशमीचा हा उत्सव सजतो आनंदात.

दारी बांधूनी तोरण लुटुया सोनं
जपून नाती मनात सुखाची करूया उधळण

रावणाचा करुनी वध रामराज्य आले
असत्याचे करीत सीमोल्लंघन पांडव विजयी झाले.

देवीच्या कृपाप्रसादाने दैत्याचा झाला नाश
म्हणून साजरा करीत सारे दसरा सण उल्हासात.

विजयानंद हा साऱ्या त्रिभुवनात शोभतो
ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा सुरआसमंती गाजतो.

सुखाची बरसात करीत दसरा सण दारी येतो
मनोकामना होवोत पूर्ण म्हणत शुभेच्छा देतो.

निमित्त साधत या दसरा सण उत्सवाचे
देवीकडे साकडे घालते मी
तुमच्या विजयानंदाचे

◼️ सौ. अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *