तू शिकायला पाहिजे.
आई तू शिकायला,शिकायला पाहिजे,
आई मी जात्याच्या पिठात एक-दोन लिहितो,
एक-एकाचा,दोन-दोनाचा
तुला बी लिहिता आले पाहिजे,
आई तु शिकायला………
बाबा तुम्ही शिकायला,शिकायला पाहिजे,
बाबा मी शेताच्या मातीत अ,ब लिहितो,
अ-अ अननसाचा,ब-ब बदकाचा
तुम्हाला बी लिहिता आलं पाहिजे,
बाबा तुम्ही शिकायला……..
दिदी तू शिकायला,शिकायला पाहिजे,
दिदी मी चुलीच्या राखीत वन,टू लिहितो,
One-1,Two-2
तुला बी लिहिता आलं पाहिजे,
दिदी तू शिकायला…….
दादा तू शिकायला-शिकायला पाहिजे,
दादा मी गोठ्याच्या शेणात ए,बी लिहितो,
A-Apple,B-Ball
तुला बी मी लिहिता आलं पाहिजे,
दादा तू शिकायला……….
◼️ कवी-श्री.दीपक सुरेश सहाणे.
नगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदिर नाशिकरोड,नाशिक. संपर्क-8378937746