शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या समस्यांसाठी शेतकऱ्यांसह कृषि अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या समस्यांसाठी शेतकऱ्यांसह कृषि अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन

सिंदेवाही :- दिनांक 28 रोज बुधवारला टेकरी , वाकल , आणि वानेरी येथील शेतकऱ्यांनी मा.पालकमंत्री चंद्रपूर ,मा.तहसीलदार सिंदेवाही पाटील , आणि मा. कृषी अधिकारी सिंदेवाही खेडकर साहेब यांना निवेदन देण्यात आले , सिंदेवाही तालुक्यात धान पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते पण यावर्षी आधीच , अतिवृष्ठीमुळे शेतीचे अतोनात नुसकाण झाले असताना आता , मावा , तुडतुडा ,करपा ,अशा अनेक रोगांनी धान पिकाला ग्रस्त केले आहे , त्यामुळे शेतीचे अतोनात नुसकाण होऊन आता एन धान कापणीच्या हंगामात इतकी मेहनत करूनही शेतीचे पीक हातात लागेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे , आणि मोठ्या प्रमाणात लागलेल्या रोगांनी धान पीक भुईसपाट करून टाकलं आहे , त्यासाठी शेतीचे तात्काळ पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना योग्य ती नुसकाण भरपाई द्या या मागणीसाठी टेकरी , वाकल आणि वानेरी येथील शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा , तहसीलदार सिंदेवाही आणि कृषी अधिकारी सिंदेवाही यांना निवेदन दिले आणि तात्काळ पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला , यावेळी या शिष्टमंडळात देवेंद्र मंडलवार शिवसेना तालुका प्रमुख , सागर गेडाम युवक कॉंग्रेस युवक नेता, पितांबरजी नागदेवते उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , यशवंतराव सुर्यवंशी सरपंच टेकरी , दिनेशजी मांडाळे वाकल , अमित गेडाम वाकल ब, दुर्वास मंडलवार टेकरी , कृष्णा मेश्राम टेकरी यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *