जिल्ह्यात सव्वा लाखाचा अवैध दारूसाठा जप्त

जिल्ह्यात सव्वा लाखाचा अवैध दारूसाठा जप्त

Ø राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई

चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोंबर: जिल्ह्यात काल राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे धाड टाकून रुपये 1 लक्ष 24 हजार 800 किंमतीचा अवैध दारू साठा जप्त केला.

दारुच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक नेहमी  गस्तीवर असते. या पथकाला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी पहाटे चार वाजता महाकाली मंदिर सुपर मार्केट वॉर्ड चंद्रपूर येथील राजेश दरबारसिंग ठाकुर यांच्या घरी धाड टाकली. यावेळी त्यांचेकडून रुपये 1 लक्ष 24 हजार 800 किमतीच्या रॉकेट देशी दारू 90 मिली क्षमतेच्या एकूण 48 बॉक्स जप्त करण्यात आले.

 राजेश दरबार सिंग ठाकूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ई) अन्वये कारवाई करून अटक करण्यात आली आहे. यासंबधात पुढील तपास सुरू आहे. वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुरचे अधिक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चंद्रपूर, गडचिरोली विभागाचे प्रभारी निरीक्षक अमित क्षिरसागर तसेच विभागाचे पोलीस शिपाई चेतन अवचट, सुदर्शन राखुंडे व जगन पुट्टलवार यांनी सदर कार्यवाही पार पाडली.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *