-ll मृगजळ ll-
दिसते तसे नसते
मृगजळ असतो फसवा
डोळ्यांचा असतो चकवा
मनुष्यचा होतो रुसवा
क्षणिक सुखासाठी
कष्ट घेतो फार
नको मृगजळ पाहू
दुःख होते अपार
अहंकार ,गर्व, नसावा
माणुसकी विसरू नको
आभास आहे बुद्धीचा
वास्तवाला सोडू नको
मनुष्य विचार करी फार
मृगजळा साठी खास
आपुलकी जपावी नात्याची
धनाची नको आस
भ्रमनिरास, स्वप्न
नको पाहू माणसा साज
मिथ्या समर्थन सोड
कर्तुत्वावर विश्वास ठेव आज