◼️ वैचारीक लेख :- तुम्हीच सांगा आता कसं जगायचं…?

तुम्हीच सांगा आता कसं जगायचं…?

आज प्रत्येक माणसाकडे भरभरून सुख आहे.पण स्वतःजवळ असलेल्या या सुखाला अनुभवायला मात्र कुणालाच वेळ नाही.आपल्याकडे जे आहे त्यात आपण कधीच सुखी नसतो.मात्र, दुसऱ्याकडे आपल्यापेक्षा जास्त आहे हे पाहून आपण दुःखी होतो. हे कटू असलं तरी सत्य आहे.आज आपण चप्पल,बूट घालायला नाहीत म्हणून दुःखी होतो.पण ज्यांचाकडे चप्पल,बूट घालायला पायच नाही त्यांचं काय?याचा कधी आपण मनाशी विचार केला आहे का?
आईने गायलेल्या अंगाईची जाणीव प्रत्येकाला आहे पण आज आईला आई म्हणायलाही वेळ नाही.ज्या आईने मुलाला नऊ महिने पदरात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.त्याच आईला नऊ दिवसांत प्रेम देणाऱ्या बायकोचं ऐकुन घराबाहेर काढणाऱ्या आजच्या पिढीला काय म्हणायचं?आणि कसं समजावून सांगायचं?
आज प्रत्येकाच्या खिशात दोन-दोन मोबाईल आहेत. त्या मोबाईलमध्ये प्रत्येकाची चार-चार नंबरही सेव आहेत. पण आज त्या नंबरवर फोन करून प्रेमाचे चार शब्द बोलायलाही आज वेळ नाही. आजची तरुण पिढी दिवस-रात्र त्या मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेली असतात.आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या मित्राला/मैत्रिणीला तु जेवलीस का?काय जेवलीस? हे सर्व विचारणाऱ्या त्यांना आपल्या शेजारी बसलेला भाऊ/बहीण दोन दिवसांपासून उपाशी आहे याची मात्र जाणीव नसते.आता तुम्हीच सांगा यांना काय बोलायचं?
ज्यां पोरा-बाळांसाठी आपण दिवस रात्र मेहनत करतो,त्यांच्याकडे क्षणभर बघायलाहीआपल्याजवळ वेळ नाही.कारण,वडील झोपेतून उठण्याआधीच सकाळी मुलं शाळेत जातात.आणि वडील रात्री ऑफिसहून घरी येईपर्यंत मुलं मात्र झोपी जातात.आईचंही यापेक्षा वेगळं काही नाही.ऑफिसला जातांना मुलांना पाळणाघरात सोडते आणि घरी येेतांना मात्र सोबत चॉकलेट घेऊन येते.कोठून येईल हो या मुलांमध्ये माया आणि ममता?या सर्वांचं उत्तर तुम्हीच सांगा आता?आज दुसर्‍यांची दुःख कोणीच जाणून घेत नाही.कारण इथे स्वतःचे दुःख सावरायला माणसांकडे वेळ नाही. अंध,अपंग,अनाथ,वृद्ध यांच्या समस्या जाणून घेणं तर लांबच राहिलं.पण भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी,प्रदूषण, दुष्काळ,बलात्कार यांसारख्या स्वतःशी संबंधित असणाऱ्या समस्यांवर चर्चासत्रांत वरचेवर औषध फवारलं जात पण या सर्व समस्यांची किड मुळासकट उपटून फेकण्यासाठी कुणीच पुढे येत नाही.शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरात अशी मनोवृत्ती असणाऱ्या समाजाला शिवाजी महाराज घडविण्यासाठी अगोदर माता जिजाऊ घडली पाहिजेत असा विचारही मनात येत नाहीत.
दिवसभर थकून भागून घरी आल्यावर डोळ्यांवर खूप झोप आलेली असते.मात्र,डोळे मिटताच डोळ्यासमोर पाणी बिल,लाइटबिल,घरपट्टी,दवाखाना बिल यांची रांग उभी राहते. त्या पाठोपाठ पडतात स्वप्न बॉसने सांगितलेल्या कामांची,मुलांच्या अॅडमिशनची आणि मुलीच्या लग्नाची घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची?आता तुम्हीच सांगा मित्रांनो,या तुटपुंज्या पगारात हौस कशी पुरवायची?एवढं सगळं झाल्यावर समजवायचो मनाला झोप आता तरी वेळ झाली झोपायची,मात्र काना जवळची बेल होताच समजावायचो मनाला,अरे वेड्या ऊठ आता वेळ झाली उठायची.बघितलंत दोस्तांनो आजच्या धावपळीच्या जीवनात माणसांकडे झोपायलाही वेळ नाही.मला माहित आहे, बंधू-भगिनींनो हे वाचल्यावर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात वेदनांचा पूर वाहतो आहे आणि आपल्या जीवनरूपी पुस्तकात घडलेल्या यांसारख्या सर्व घटनांचा जीवनपटरुपी पाने पटापट डोळ्यासमोर पुढे सरकतात पण घडलेल्या सर्व घटनांना दोन मिनिटं आठवून रडायलाही आज आपल्याजवळ नाही.
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या या संघर्षात जरा मागे वळून पाहायलाही आज आपल्या जवळ वेळ नाही…..!!!
“तुम्हीच सांगा कसं जगायचं….?”

Mob. ८३७८९३७७४६.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *