◼️ काव्यरंग :- स्नेहवेल ✍️ सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि २८ /आॉक्टोबर/ २०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘स्नेहवेल‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे

स्नेहवेल

मनुष्याची अन् निसर्गाची
स्नेहवेल अशी जुळावी,
करावे वृक्ष संवर्धन मानवाने
निसर्ग-गाली हास्य कलिका फुलावी!

झाडे-वेली, पशु-पक्षी,
सारे मानवाचे सोयरे व्हावेत,
स्नेहवेल बहरुन परस्परांत,
प्रदुषण-राक्षस जळून जावेत!

उघडे बोडके डोंगर पाहूनी
तेथेही वृक्ष लागवड करावी,
वृक्षसंवर्धन करता करता,
निसर्गरक्षणाची कास धरावी!

अन्न, वस्त्र,निवारा,वायू,
निसर्गच मानवा पुरवत असतो,
जाणीवपूर्वक जुळवली स्नेहवेल तर
पश्चात्तापाचा तिथे लवलेश नसतो!

श्री.मंगेश पैंजने सर,
ता.मानवत,जिल्हा-परभणी
© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.
🌾📚🌾📚🌾📚🌾📚🌾📚🌾
स्नेहवेल

मिळतील का कुठे,मैत्रीच्या बिया
लावावे म्हणते,अंगणात माझ्या

काळजी घेऊनी, वाढवेन स्नेहवेलाला
खतपाणी घालुनी,जपेन तयाला

रोज नवी पालवी,फुटेल नात्याला
मैत्रीच्या ऋतूत,येईल बहर स्नेहवेलाला

जाईन जवळ,हळूच धरेन फांदीला
देईल आधार मज ,सुखाची सावली द्यायला

असती खूप मित्र, समाजात आपल्याला
क्वचित दुरावा येता,दुर करता मित्राला

सांगणे एक, मैत्रीत येता दुरावा
मैत्रीचे एक, स्नेहवेल अंगणात रुजवा

येता स्मरण मित्राचे,पहावे त्या स्नेहवेलाला
म्हणुनी विचारते,मिळतील का कुठे मैत्रीच्या बिया

सौ. सुनिता लकीर आंबेकर
खानवेल दादरा नगर हवेली
©️सदस्या मराठीचे शिलेदार समुह
🌾📚🌾📚🌾📚🌾📚🌾📚🌾

स्नेहवेल

नात्यातील स्नेहवेल
सदाबहार असावी
रक्ताची वा मानलेली
कामापुरती नसावी…

परस्पर विश्वासाचा
अलिखित वायदा.
खर्‍याखुर्‍या प्रेमात
नको केवळ फायदा..

मंद गंध दरवळणारी
स्नेहवेल ही हर्षावी
भरभक्कम आधाराने
आभाळाला स्पर्शावी…

वत्सल माया ममतेची
विविध फुले फुलावी
लदबदलेली स्नेहवेल
वार्‍यावरती झुलावी…

अंतरीच्या काळजीने
स्नेहवेलीस जपावे
प्रेमावाचून जग सुने
हेचि मर्म जाणावे…

छाया जावळे, वाई, सातारा
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह
🌾📚🌾📚🌾📚🌾📚🌾📚🌾

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

2 Replies to “◼️ काव्यरंग :- स्नेहवेल ✍️ सदस्या, मराठीचे शिलेदार समूह”

  1. कवितेच्या दुसऱ्या कडव्यावर येणारी जाहिरात हटवा,प्लीज…

  2. जाहिरात हटवली तर दुसरे कडवे गायब झाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *