◼️ ललित लेख :- भेट…..

🔴 भेट……………..   

दुनिया जिसे निंद कहेती है….
जाने वो क्या चिज है!
आँखे तो हम भी बंद करते है…..
पर, वो आपसे मिलने की तरकिब है!

तु येणार आहेस मला भेटायला…. माझ्याशी बोलायला…… माझी आणि माझिच होण्यासाठी!…… तु नक्की येनार आहेस नं तुझ्या त्या आवडत्या मित्रासोबत प्रेमसरित भिजण्यासाठी!…… तसे मला जाणवू लागलेत तुझ्या मधुमिलनाचे शुभसंकेत….. तु येनार हे आता निश्चित झालं, म्हणून मी तुझ्या प्रतिक्षेत!……. अगदी चातकासारखा!

बघ नं निरभ्र आकाश दाटून आलाय, तुझ्या आगमणाच्या चाहुलिसंगे….. रानातल्या पक्षांनाही ओढ लागली, अगदी माझ्यासारखिच….. तु येशिल म्हणून!…..मोगऱ्याची पांढरीशुभ्र फुलं हसु लागलित, दरवळु लागलित,चोहबाजुंनी…. गावातील गुरे- वासरे, झाडांवरिल चिमण्या, कृषिवंत माणसं, चिमुकली मुलं, निसर्गातलं प्रत्येक जिव नि जीव आतुर झालेत, तुझ्या अन् तुझ्या मित्राच्या स्वागतासाठी!…… अगदी सज्ज झालीत नेहमीसारखिच!….

क्या माँगू खुदाँ से, तुम्हे पाने के बाद
किसका करु इंतजार, जिंदगी मे तेरे आने के बाद
क्यु प्यार में जान लुटा देते है! लोग
मुझे मालुम हुवा, तुम्हे अपना बनाने के बाद

सखे! आता बघ ना…. तु येत आहेस म्हणून माझे सुद्धा डोळे पाणावलेत, माझं मन सुध्दा आतुर झालं,तुझ्या व तुझ्या मित्राच्या भेटीसाठी! …….. नुसता एकटक बघु लागलोय त्या आकाशाकडे, अन् तुझ्या येण्याच्या पाऊल वाटेच्या दिशेकडे…..भिरभिरु लागलित पक्षी, सळसळु लागलित झाडांची हिरवीकंच पानं, गाऊ लागली कोकिळा, चिमुकली मुलं खेळू लागलित, मि सुध्दा गाऊ लागलो, तुझेच प्रेमगित!…… क्षणभर मि डोकावून बघितलं तुझ्या येणाऱ्या पाऊल वाटांच्या दिशेकडे!….. तु येत आहेस असं मला जाणवलं. मि पुन्हा एकदा, दचकुन पुरतं जागं झालो. अन् गायला लागलो मनसोक्तपणे तुझेच प्रेमगित!…….

आ तेरी तस्विर बना लुं ,
मै अपनी तकविर बना लुं ,
दिल के कोरे कागज पर,
उल्फत कि लकिर बना लुं ,

हिरवंकंच गवत नाचु लागलं, गाऊ लागलं, गार वार्‍याच्या झुळकिसरशी!…. आकाशातला सुयँ लपुन बसलाय, अगदी आत, खोल- खोल निळ्यागदँ आकाशाच्या कुशीत…… सखे! तु सुध्दा घर करुन बसलिस माझ्या हृदयात! माझ्या स्मृतिपठात!…… बघता बघता तु आलिस न चुकता…. लाल गुलाबी वस्त्र घालुन! काळे घोर केस मोकळे सोळुन ! पायात पैजन घालुन! केसात गजरा माळुन! प्रितीच्या पाऊलवाटेने तु आलिस, फक्त माझ्या अन् माझ्यासाठी!….. मला भेटण्यासाठी , माझ्याशी हितगुज करण्यासाठी , तु आलिस कायमची माझी अन् माझिच होण्यासाठी!….

तुला बघता क्षणी रानातले पक्षी लाजलेत. भुरँकण ऊळून गेलित आपल्या घरठ्यात विसावा घेण्यासाठी!…. सांज झाल्यामुळे येऊ लागलित कृषिवंत माणसे घराच्या दिशेने….. गावातली गुरे धाव घेऊ लागलित गोठ्यात परतण्यासाठी….. मि मात्र घराबाहेर…. तुम्हा दोघांनाही गाठण्यासाठी! तुमच्यात एकरुप होण्यासाठी!…. माझी नजर चुकवून, तु नकळत आलिस, आपल्या मित्रासोबत…… वादळाने वेग वाढवला. विजांचं कडाडनं सुरू झालं. ढगही दाटुन आलेत. जिवजंतु सैरावैरा झालेत. सवँत्र पसरला अंधार अंधार आणि अंधारच…. बरसु लागला तुझा मित्र पाऊसाच्या रुपात आम्हा दोघांवरही!…. तुझ्या मित्राच्या ऐकेका सरिंनी तु घाबरली, किंचाळु लागलिस. तुझा मित्र मुसळधारपणे बरसु लागला. सारा निसगँच झाला पाऊस पाऊस प्रित पाऊस!…..अन् तु माझ्या मजबूत बाहुत येऊन सामावलीस, अगदी राधेसारखी!….. सवँत्र बरसु लागला तुझ्या माझ्या प्रितिचा अनमोल पाऊस……आपला निस्वाथँ प्रेम झाला चिंब नि चिंब!… चिंब झाला आसमंत… चिंब झाले पानवटे… चिंब सारा गाव…. अख्खं चराचर चिंब….. दोन शरिर दोन मन प्रित पाऊसात चिंब….. चिंब तु चिंब मी मनातुनही!….. हिच तर, होती प्रिये तुझ्या माझ्या प्रेमाची पहिली पाऊस भेट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *