कोजागिरी
पाहून अवतीभवती
चांदण्यांची जादूगरी,
वाढतो कलेकलेने
तेजाळतो नभांतरी!
चहाटळ तारकाही
सोबती लकाकती,
अकाशगंगेच्या मार्गेत
प्रतिबिंबे चकाकती!
सुवासिक क्षीरामधे
धरेवर घरोघरी,
डोकावून पाहतसे
चंद्रमुख खरोखरी!
अलवार चाळवितो
युगूलांस क्षणोक्षणी,
शारदीय पूनवेस
प्रितीचाच शिरोमणी
तारुण्यात करवतो
ह्रृदयांची हाराकिरी,
पौर्णिमेच्या चांदव्यास
भुलविते कोजागिरी!
◼️🔷✍️🔷◼️
“प्रिया प्रकाशची”
सौ. प्रिया प्रकाश गावडे, ठाणे