🔷 काव्यरंग :- कोजागिरी

कोजागिरी

शरदाचं चांदणं
मध्यान रजनी
विश्वासाची चुलं
भरवशाचं पातेलं
शडविकाराचा जाळ
निरसं शुध्द क्षीर
ममतेचे बदाम पिस्ते
स्नेहाची साखर थोडी
आपुलकीचं उलथानं
ग न लागण्याचा आटापिटा
ऊतू जाईल ऐवढी आस ….

माळदावर बैठक
गप्पा आणि गोष्टी
किस्से व अंताक्षरी
बाळगोपाळा जागावणं
कुरकुरे असे पापड
कांदाभजी लयभारी
चांदण्यांच्या गराडयात
चांदोमामा येई थाटात
हसतो जेव्हा गाली
जगण्यास बळ मिळे
नवी स्वप्ने पहाण्यास …

पारदर्शक स्वच्छ
निर्मळ मनाचा प्याला
मनसोक्त असा भरा
दुखःस घालून फुंकर
निवांत घेऊ घोट
नात्यात न यावी खोट
माणुसकी जपावी
आयुष्य अल्प जरी
आंनदानं करुया साजरी
आशी गोड कोजागिरी
अनं सोबत जिवाभावाची माणसं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *