चंद्र नभीचा
चंद्र नभीचा देखणा,
चांदन चुरा सांडला अंगणी.
तुझ्या-माझ्या अव्यक्त प्रीतीची,
कहाणी सांगते साजणी.
कृष्ण खेळे रासलीला,
शरदाच्या चांदण्यात .
गोपिकांसवे रंगात रंगून,
जागरण करी व्रुंदावनात.
कोजागिरी पौर्णिमेस,
लक्ष्मी येईल पृथ्वीवर.
ज्ञानासाठी सजग असणाऱ्यांचे ,
रूप शोधी धरेवर.
पुनवेच्या रात्री तयार ,
मोती होते शिंपल्यात.
बौद्ध संस्कृतीतही आहे
मान कोजागिरीचा धर्मात.
चंद्र किरणांनी मंतरलेले
दुग्धपान करू आनंदात.
रोगही पळून जातील,
निरोगी असू जीवनात.
🔷🔷🔷 ✍️ 🔷🔷🔷
सौ जयश्री पंकज मराठे, नाशिक .
©️सदस्या- मराठीचे शिलेदार समूह