◼️ काव्यरंग :- काव्यातून परिचय

काव्यातून परिचय

जन्म माझा चैत्राचा
चैत्रकन्या चैताली
आई पुष्पा देवी
प्रेम रंग गुलाबाची कळी…!!१!!

वडील श्री प्रमोद
व्यक्तिमत्त्वात नावासम बोध
आम्ही तिघे बहीण भावंड
आजीआजोबाचे लाडाचे नातवंड..!!२!!

येंगडे परिवाराची मी ज्येष्ठ कन्या
कोसुरल्याची राहाती चैत्रकन्या
विश्वविख्यात प्रसिद्ध वर्धा जिल्हा
त्यात आमचं छोटस गाव कोसुर्ला..!!३!!

सेवाग्राम आश्रम गांधींची बापुकुटी
वर्धत बापूची कर्म मोठी
विनोबाची विचारधारा
सद्गुणांचा वाहतो झुळझुळ वारा..!!४!!

भावनांचे वृक्ष जडले अंतरी
काव्य नाव पोहचली समृद्र किनारी
मनात ताल मेळ जुडला भावनांचा
श्वासात माझ्या सुगंध कवितेचा…..!!५!!

व्यवसाय विद्यार्थीनी परिचारिका
धावपळ करत झिजतात टाका
सेवाभाव मुख्य मुद्दा
ओळख आमची कोरोना योद्धा…!!६!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *