◼️ काव्यरंग : विरोधाभास

… : विरोधाभास : …

अपंगत्वावर केली मात
आत्मविश्वास ध्येय गाठतो ,
विश्वासाला केलं पंगू
आळस भिकेला लावतो |

नको ओझे हातांचे
ना उजवा ना डावा ,
जगण्यानं शिकवलं
मशाली कर्माच्या पेटवा |

पाय माझे हात ही झाले
नाही कामाची ओरड कधी ,
अहोरात्र चाल त्यांची
कष्टाची पायरी चढता आधी |

धडधाकट शरीर भावाला
आळस कसा रे नसात भरला ,
विना कष्ट अन् विना घाम
हरामी खिसा भिकेनं भरला |

नाही हमालीची लाज मला
जगण्याची बघ छाती फुगली ,
भिकेत कसलं रे जगणं तुझं
मरणाला ही तुझी लाज वाटली ||

◼️ दिलीप श्रीपाद बारवकर , नाशिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *