प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या

प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या

धानोरा (जि. गडचिरोली) : धानोरापासून एक किलोमीटर अंतरावर चव्हेला रोड लगत कम्पार्टमेंट ५२० मध्ये रात्री प्रेमीयुगुलाने एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्या सदाशिव उसेंडी (वय २२, रा. पवनी) व राजेश लालसाय पोटावी (वय २८, रा. दराची) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दोघेही धानोरा तालुक्यातील रहिवासी आहेत. कप्मार्टमेंट ५२० मध्ये झाडाच्या एकाच फांदीला विद्याने ओढणीने तर राजेशने दुप्पट्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या आत्महत्या प्रेम प्रकरणातून घडल्याचे बोलले जात आहे. दोघेही रात्रीपासून बेपत्ता होते. घरच्यांनी शोध घेतला असता शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास धानोरा पोलिस करीत आहे.

काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रेमीयुगुलाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेतली होती. प्रदीप राजू गिरडकर (वय २०) असे युवकाचे तर कांचन अरविंद नागोसे (वय १७) असे युवतीचे नाव आहे. गडचिरोली येथील रामनगर परिसरातील प्रदीप गिरडकर हा युवक बारावीचे शिक्षण घेत होता. प्रदीपचे फॉरेस्ट कॉलनी येथील कांचन नागोसे या दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. एकमेकांच्या हाताला रुमाल बांधून नदीत उडी घेतली होती.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *