◼️ काव्यरंग : चाहूल थंडीच. ✍️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात घेण्यात आलेल्या ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील ‘चाहूल थंडीची‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना..

चाहूल थंडीच
आवडतं मला तुझं

अस्स भन्नाट लिहीणं..
गाते जशी लेखणीतून
पावसाचं गाणं..
शब्दांच्या भेटीसाठी मन
घाली पायात पैंजण..
मिळती मग सुखाची
तुला चार दोन दाणं..

कधी चाहुल थंडीची
अन् गार वारा..
त्यात भावनांच्या पडती
धुंद टपोर गारा..
कधी फुंकर घालूनी
विझवितेस निखारा..
धुक्यापलीकडे पाझरे
अमृताचा झरा..

बनते स्वतःच चालक
नवी दुनिया बांधते..
जातीभेदांच्या भिंतींना
काव्यातून गं सांधते..
दीन दुःखी दलितांना
गोड घास तू रांधते..
खुदा राम येशूसाठी
प्रेमझरा तू खंदते..

◼️सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह
🍃❄️🍃❄️🍃❄️🍃❄️🍃❄️🍃
चाहूल थंडीची

दिवसा तप्त गर्मीचा तडाखा,
रात्री बोचरा सुखद गारवा .
आल्हाददायी वातावरणात ,
मनभावन ऋतू हा बरवा.

हेमंत ऋतूचे प्रभावी चैतन्य,
चाहूल थंडीचे तनुस वाटे
उबदार स्वेटर, टोपी संगे
कोवळ्या उन्हात दाटे.

शितल लहरींनी हुडहुडी भरे,
सारवलेल्या अंगणी शेकोटी जळे.
गप्पागोष्टींना येई ऊत,
बाल आठवणीत मन वळे.

हिरवा निसर्ग घेई लपेटून
दवबिंदूची चादर धुक्याची
अंधुकलेल्या वाटा धुंडाळत
संधी सृष्टीशी हितगुजाची.

चाहूल थंडीची मनास मोहावी,
हुरडा पार्टींनी रंगत येई.
डिंक,बदाम, साजूक तुपातले,
लाडूंची दरवळ घरोघर होई.

सौ जयश्री पंकज मराठे
नाशिक
©️सदस्या- मराठीचे शिलेदार समूह
🍃❄️🍃❄️🍃❄️🍃❄️🍃❄️🍃

चाहूल थंडीची

हिरवा शालू नेसून आली
धरा ही दवबिंदूंनी न्हाली
शुष्क रखरख त्वचा गाली
आज चाहूल थंडीची झाली

शेकोटी सारेजण पेटवुया
मित्रांना लवकर उठवूया
मनात आनंद साठवूया
आळस बाजूला हटवूया

आकाश कंदील लावूया
प्रकाश तयाचा पाहूया
छान छान गीते गाऊया
आनंदात आपण राहूया

चाहूल थंडीची लागली
कोजागिरीस सारे जागली
कडक थंडीने तोफ डागली
थंड कापड आम्ही त्यागली

पौळ विनायक शेषराव
पालम परभणी
@सदस्य मराठीचे शिलेदार समूह

🍃❄️🍃❄️🍃❄️🍃❄️🍃❄️🍃

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *