◼️ काव्यरंग :- गुरु महिमा

गुरु महिमा

पाठीवरती प्रेमाचा
हात असतो गुरु
अंधारातल्या दिव्यामधली
वात असतो गुरु

माणसातल्या खरेपणाचा
संस्कार असतो गुरु
अखंडित सदा मायेचा
आधार असतो गुरु

संस्कारांच्या धनाची
तिजोरी असतो गुरु
सोबतीला सुविचारांची
शिदोरी असतो गुरू

शिष्यासाठी त्याचा खरा
मित्र असतो गुरु
सुसंस्कारी जीवनाचं
सूत्र असतो गुरू

विश्वासाच्या नात्याचं
नाव असतो गुरु
माणसा – माणसातला
देव असतो गुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *