◼️ काव्यरंग :- मनातलं गुपीत

मनातलं गुपीत

भावनांचा जेव्हा कोंडमरा होतो
व्यक्त करण्यास आपण घाबरतो,
मनातले मनात तसेच राहून जाते
अव्यक्त भाव मनातलं गुपित बनतो

आयुष्यभर मनात भावना दाबत
आयुष्य आपण घालवत राहतो
मन मारून आयुष्य आपण असेच
दुसऱ्यासाठी जगत रहतो

मनातलं गुपित बोलता येत नाही
विश्वासाच्या कोणी पात्र होत नाही
आपलेच आपल्याला सोडून जातात
विश्वास तेव्हा कोणावरच बसत नाही

मनातलं गुपित ऐकणार आपलं
असावं असं सारखं वाटत राहतं
भावना व्यक्त करण्यासाठी मन
कायम आतुरतेने वाट पाहत राहतं

◼️🔷🔷✍️🔷🔷◼️ 

विजय शिर्के , औ. बाद .

© सदस्य मराठीचे शिलेदार समूह 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *