जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांच्या नेतृत्वात राजुऱ्यात शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

 जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम यांच्या नेतृत्वात राजुऱ्यात शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

पक्षवाढ तसेच माजी पदाधिकाऱ्यांच्या कामांचा घेतला आढावा

राजुरा : दि. 02/11/2020 रोज सोमवारला नियोजित शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांतजी कदम आणि जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचा नेतृत्वात राजुरा येथील शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांची बैठक सानेगुरुजी सभागृह राजुरा येथे पार पडली. सर्वप्रथम श्रीधर रावला सामाजिक कार्यकरता धोपटाळा याचा ५० कार्यकर्ते्यासह प्रवेश घेण्यात आलात,

पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार संघटनेची बांधणी आणि समाजसेवा या दोन्ही गोष्टीची सांगड घालून शिवसेनेच्या वतीने तालुक्यात गोरगरीब शेतकरी, मजूर वर्गाची सेवा करण्याचे आव्हान संपर्क प्रमुखांनी केले. तालुक्यात माजी पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत पुन्हा जोमाने कामाला लागा असे आव्हान करण्यात आले.
तर जिल्ह्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शिवसेना आणि शिवसेनेचे कार्य पोहचवण्यासाठी मी पाठीशी असल्याचे आश्वासन जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिले.
महिला सशक्तीकरण आणि समाजातील महिलांच्या समस्यांबद्दल शिवसेना सतत कार्य करत राहील अश्या भावना महिला उपजिल्हा संघटिका सरिताताई कुळे यांनी व्यक्त केल्या तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य वासुदेव चापले यांनी केले.

याप्रसंगी जिल्ह्याचे युवासेना समन्वयक निलेश बेलखेडे, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, नगरसेवक आणि सदस्य संजय गांधी निराधार योजना राजू डोहे, शिवसैनिक निलेश गंपावार, वसीम भाई अन्सारी, राजू येरावार तसेच तालुक्याचे युवासेना पदाधिकारी रमेश झाडे, बंटी मालेकर, असिफ शेख, गणेश चौथले,नबीखान पठाण, महिला आघाडी मध्ये दीपालीताई बकाने, आशाताई उरकुडे, कलावतीताई इंदूरवार,सुरेखा तालांडे आणि कार्यक्रमाला शेकडोनि जमलेला शिवसैनिक, युवासैनिक आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *