◼️ काव्यरंग : आग्रह शेवटचा

आग्रह शेवटचा

“आऊ” ममतेची काया
“आऊ” आभाळाची छाया
भेट कशी होई आता
गेल्या निघूनी स्वर्गाच्या दारा ..

अशी घेतली गगनभरारी
जादुई पंख लावूनी
शोध घेतसें नजर वेडी
आकाशी टक लावूनी..

आग्रह शेवटचा नाही धरीला
मनभरूनी भेटण्याचा
घरटं सोडताना पिल्लांना
घास भरविण्याचा..

मनाची श्रीमंती अन्
अंतरी समाधान
कल्याणमय विचारांचे होते
अंगी प्रभुवरदान..

जिद्द होती जगण्याची
सहनशक्ती विशाल
असाध्य आजारासही
हरवण्यास तत्पर खुशाल..

प्रारब्ध स्वीकारून हरल्या
दोष नसे हा कुणाचा
आत्मशांती मिळावी आत्म्यास
प्रभुस करिते आग्रह शेवटचा ..!

◼️सौ. संध्या मनोज पाटील अंकलेश्वर, गुजरात
© मराठीचे शिलेदार समूह सदस्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *