◼️ काव्यरंग : अग्निकुंभ

अग्निकुंभ

येथे माणसेच एकमेकांच्या
जीवावर उठली आहे
माणसांच्या बाजारात
माणुसकी विकली आहे
फसवेगिरी,अत्याचार, बलात्कार
येथे रोजच घडत आहे
माणुसकीच्या नात्याला
काळीमा फासत आहे
खुर्चीसाठी जातीधर्माच्या नावावर
राजकारण खेळत आहे
सामान्य जनतेच्या डोळ्यांत झुल झोकून
पहिले आपलेच घर भरत आहे
साम,दाम,दंड,भेद आजमावून
माणुसकी गहाण ठेवता आहे
भ्रष्टचाराला खतपाणी घालून
बीज विषमतेचे पेरत आहे
त्यासाठी सर्वांनी एकीने वागून
अशांना धडा शिकवायचा आहे
प्रत्येकांनी या अग्निकुंभात कुविचिरांची
होळी आता पेटवायची आहे
आणि या लागलेल्या ग्रहणातून
देशाची मुक्तता करायची आहे

◼️सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *