‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ प्रत्येक व्यापारी आस्थापनेने मोहीमराबवावी: जिल्हाधिकारी अजयगुल्हाने

मास्क नाही तर प्रवेश नाही’ प्रत्येक व्यापारी आस्थापनेने मोहीमराबवावीजिल्हाधिकारी अजयगुल्हाने

Ø नियमांचे पालन  केल्यास कठोरकारवाईचे संकेत

चंद्रपूर दि.6 नोव्हेंबर: जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचेप्रमाण पुर्वीपेक्षा थोडे कमी झाले असले तरी कोरोनाअद्याप संपलेला नाही, येत्या काही दिवसातसणासुदीमुळे बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दीवाढण्याची शक्यता आहे. व्यापारी प्रतिष्ठान वबाजाराच्या ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षीत अंतर राखणेयासारख्या कोरोना प्रतिबंधंक उपाययोजनांबाबतजनजागृती वाढविण्यासाठी व्यापारी वर्गाचे सहकार्यमहत्वाचे असल्याने प्रत्येक दुकाणात व आस्थापनेत‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ ही मोहिम राबविण्यातयावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनीकेले.

जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावास आळाघालण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनीआज चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी, व्यापारी संघटनाव संबंधीतांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करूननागरिकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती करण्याचेआवाहन केले.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी ग्राहक तसेचदुकानदारांना कोरोनापासून बचावाची काळजी घेणेआवश्यक असून कोणत्याही परिस्थितीत मास्क नलावता आलेल्या ग्राहकांना वस्तु विक्री करू नये असेसांगितले. सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानात मास्कविक्रीसाठी ठेवावे. विना मास्क येणाऱ्या ग्राहकांनासर्वप्रथम मास्क देवून त्याचे माफक शुल्क आकारण्यातयावे, अशी प्रणाली कार्यान्वीत केल्यास दुकानदार वनागरिक यांना सोयीचे होईल असेही त्यांनी सांगितले.

ज्या आस्थापनेत ग्राहक दुकानाच्या आतमध्येयेतात तिथे प्रत्येक दुकानमालकाने ग्राहकांकरिता हातस्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर, शरीरातीलऑक्सीजनचे प्रमाण मोजण्यासाठी पल्स ऑक्सीमीटर वशरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्किनींग मशीनठेवणे आवश्यक राहील असे सांगीतले. तसेच प्रत्येकग्राहकाची नोंद संपर्क क्रमांकासह नोंदवहीत ठेवण्यातयावी जेणेकरून संबंधीत ग्राहक बाधीत झाल्याचेआढळून आल्यास कॉन्टक्ट ट्रेसींग करून संपर्कातआलेल्यांना वेळीच उपचाराकरिता सूचित करता येईल. दुकाणांसमोर ठरावीक अंतरावर वर्तूळ आखणी करूनप्रवेश संख्या मर्यादीत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

नियमांचे पालन न केल्यास दंड आकारणीसहफौजदारी कारवाई देखील करण्यात येईल असा इशाराहीजिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी दिला.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *