◼️ काव्यरंग :- गझल

गझल

उगाच करतो मी त्रागा प्रेमाचा,
ती आता मजला ओळखत नाही..
किती दाखले मी दिले प्रेमाचे,
ती म्हणते आता,दिल धडकत नाही…

उगाच बांधतो मी महल कल्पनेचा,
ती आता स्वप्नात फिरकत नाही..
खुशाल म्हणते जुने जा विसरूनी,
नव्यास त्याची काय हरकत नाही…

उगाच भरतो मी मन वेदनांनी,
ती आता कधीच बरसत नाही…
किती उधळतो गंध अत्तराचा,
दरवळ मात्र कुठेच पसरत नाही…

उगाच करतो मी कविता तिच्यावर,
ती आता शब्दांना गवसत नाही..
लपवते आश्रू ती डोळ्यांन मधले
वाटते स्वतःला तर ती फसवत नाही….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *