◼️ काव्यरंग :- आई

हँलो आई!
मि तुझ्या उदरातुन तुझी लाडकी बोलते….
मि माझ्या मनातल्या भावना हळुवार खोलते….

तुझ्या या जगात
मला जन्म देशिल का?
चांगली वळण – संस्कार
तु मला लावशिल का?

कि, तुझ्या या जगातली माणसं
करतिल माझ्यावर अंन्याय
मग मिळेल का ग मला
त्यातुनच न्याय?

अगं आई, तुझ्या त्या जगात…
दिल्लीत काय? गल्लित काय? होत आहेत नुसते बलात्कार.
मग मला पण, सहन करावं लागेल का ग?
असा हा अत्याचार

अगं तुझ्या मुलिला दिलंय
परमेश्वराने सुंदर रुप….
पण, तुझ्या जगातली मुलं
अँसिट टाकुन करतिल मला विद्रूप….

तुझ्या जगातली माणसं
करतात जन्मताच भ्रूणहत्या….
मग माझिही करतिल का गं?
अशिच केविलवाणी हत्या….

खरच आई! तुझ्या जगात येण्याची
वाटतेय् गं मला भिती…
तुझ्या जगातली माणसं
विसरली गं नाती – गोती….

आई मला तुझ्या उदरातच
मिळाले गं खुप सारे सुख….
पण, तुझ्या जगात आल्यावर
मिळतिल का गं मला दुःख

आई तुझे ते जग
खुप आतंकित झाले!
मला असं वाटते की,
मि तुझ्या उदरातच
पोरकी झाले!

अगं आई खूप झालं
ठेवते मि फोन….
मला माहित नाही
तुझ्या जगात आहेत, माझे कोण कोण?
तुझिच लाडकी!

◼️ ✍️ कवी: संदिप मेश्राम ( प्रेम दीप)
खरकाडा, गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *