◼️ काव्यरंग :- विभाजक

विभाजक

नात्यांच्या गुंफणीला
संशयाचे विभाजक
उसवतात पक्के धागे
बाकी उरते अराजक

वागा कितीही नेकीने
बदलणार नाही मत
असाध्य या रोगापुढे
तुमची शुन्य किंमत

कितीही द्या दाखले
कोणतेही उदाहरण
संशयाच्या भुताला
पुरे शुल्लक कारण

विभाजक सांधणारा
नाही कोणता इलाज
वाढतच जाई दुरावा
विभक्त होणे नाईलाज

वाद जाता विकोपाला
अटळ ठरलेला विनाश
विभाजकाच्या अडथड्याने
जीवनाचा थांबतो प्रवास

✍️ श्री अरविंद उरकुडे, गडचिरोली
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *