◼️ काव्यरंग :- रम्य सकाळ

रम्य सकाळ

ऊन्हं चोरूनी अंगाशी
झाली रम्य ही सकाळ
लाल-केशरी प्रकाशात
न्हाले आकाश मवाळ

ताप उबीचा हळूवार
चढविलाय भास्कराने
चिंब घामानेच पिडूनी
गाई मानवच गाऱ्हाणे

तापलेल्या या धरणीवर
येई रोजला नवेच संकट
उठतोय मधूनच थरकाप
मार्गच जीवनाचा बिकट

निसर्गाची अशी अनोखी
दिसतेय रोजची किमया
प्रश्न उठला आम्हांपुढती
हे पेलावे वादळ लिलया

कसे जगावे सुखाने इथे
वाट आयुष्याची खडतर
पोषक आहार घेऊनीया
करावेच शरीरही कणखर

लागेल रोजच्या सकाळी
नव्या संकटाची ही चाहूल
बुद्धिवान अशा माणसाचे
पडतेय पुढे माझे पाऊल

तोंड देऊनि धैर्य हिमतीने
मार्ग चालतोय हाच जपून
करूया मातही संकटावर
नको बसायला इथे लपुन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *