◼️ काव्यरंग :- विद्येची देवता क्रांतीज्योती

।। विद्येची देवता क्रांतीज्योती ।।

मुलींच्या शिक्षणाला तिने लावला हात
शिक्षणाचा तिने घेतला ध्यास,
कधी न हरल्या कधी न झुकल्या
वंदन करूया सावित्रीच्या कार्यास।।

मुलींच्या शिक्षणाचा तिने घडविला पाया
तीची मेहनत कधी न गेली वाया,
शिक्षणाच्या निरंतर वाटेवर आहे
नेहमी तीच्या मातृत्वाची छाया।।

सावित्रीबाई फुले आहे विद्येची देवता
आद्य शिक्षिका स्त्रियांच्या त्या मुक्तीदाता,
दगड धोंडे तिने सहन केले जरी
तीच आहे आमची शक्तीदाता।।

होत्या सावित्रीबाई म्हणून घडल्या आमच्या मुली
शिकून सवरून झाल्या मोठ्या पदाच्या दावेदार,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेला करू नमन
त्यांनी दिले आम्हाला शिक्षणाचे संस्कार।।

शिक्षणाच्या वाटेवर जिन्हे पेटविली मशाल
क्रांतीज्योतीचा मोठा आविष्कार,
क्रांतिसूर्याच्या ज्ञानज्योतीला
आमचा आदरपूर्वक नमस्कार।।

🔴 कवी ✍अतुल मारोती येरगुडे
पत्ता. सिदूर पोष्ट. पिपरी (धानोरा)
तह. जिल्हा. चंद्रपूर
मोबाईल. 9763975627, 9284155702

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *