◼️ काव्यरंग :- दिवादेह ✍️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि ०७/नोव्हेंबर/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील ‘दिवादेह‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.

देहदिवा

हिरव्या मखमली शालूत
देहदिवा तुझा खुललाय
चिंब पावसाच्या धारेत
साज नववधुचा चढलाय..

रंगीबेरंगी सुमनांचा
चौफेर गालीचा पसरे
बेभान होऊनी सारे
टिपती सुंदर ते नजारे..

रवीराजानंही गिरीशिखरं
जणू सोन्यानं मढवली..
ओलेती नार धरा ही
आंगोपांगी पहा बहरली..

सरी दुधाळ धबधब्याच्या
अभिषेक जणू करती..
नदी निर्झर झुळझुळ
ताल धरूनी ते वाहती..

कुंतली माळला गजरा
सप्तरंगी इंद्रधनुचा..
गर्भार होऊनी फुलवी
शिवार ती बळीराजाचा..

जागोजागी वृक्षवेलींनी
भाळी बाशींग बांधिले
सोळा शृंगार लेवूनी
धरेचे रूप कसे सजले..

◼️सौ.सविता पाटील ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥
दिवादेह

ती दिवादेह होऊन
करी वाऱ्याशी सामना
संकटावर मात करून
धीरोदात्त ती ललना

स्वतः उपाशी राहुनी
घरास हात देई
झिजला देह परी
चिंता पिलांची करी

क्षण एक येतो असा
जाई झिजून पूर्णतः
करपून गेली काया
दिवादेह होऊन समर्पित

गुण तिचा एक छान
घेऊ नारीचा आपण
पावला गणिक बनू
तिचा श्रीहरी आपण

सकलांना वाट दाऊ
देऊ संस्काराचा हात
अबला नाही ती
ती प्रकाशाची ज्योत

🔴 श्री पैठणकर सर नाशिक
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥

दिवादेह

कमलनयनी कमलाक्षी
तू कोमलांगी कमळिनी
विसावलो कुशीत तुझ्या
सखये भ्रमर मी होवूनी… //

कमनीय कटी सुकुमार
कर्दळ काया नाजुकशी
घनदाट कुरळ केसांची
सळसळ जणू नागिणशी.. //

कुसुम कळी ओठातून
दरवळतो सुहास्य गंध
मी कुरवाळतो हळूवार
करात या होवूनी धुंद… //

काजळ गर्द कोरलेस
पापणकडा काळ्याभोर
लावू नये कुणी नजर
तीळ काळा हनुवटीवर… //

तारीफ किती करू अजून
हे कोरीव देह शिल्प तुझे
तूच कायम या आयुष्यात
हे सखे परम भाग्य माझे…. //

ह्रदय मंदिरात माझिया
दिवादेह तूझा लाविलास
जीवन सारे प्रकाशमान
जाळलेस काळ्या तमास.. //

🔷विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥🍃🔥

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *