◼️ काव्यरंग : लगबग दिवाळीची !

लगबग दिवाळीची !

शोधा, मातीच्या पणत्या,
पुस्तकेही रांगोळीची!
साफसूफ घर करा,
लगबग, दिवाळीची!

फराळाच्या सामानाची,
पटापट यादी करा!
चांदणीचा तोरा नको,
आकाशकंदिल बरा!

कपड्यांच्या खरेदीची,
वेळ, पद्धत ठरवा!
भ्रमणध्वनीवरुन
उद्या अथवा परवा!

लाडू, चिवडा, करंजी,
शेव नि शंकरपाळे,
कडबोळी, अनारसे
हवे, भरलेले थाळे!

अभ्रे, पडदे, चादर
साठवणीतली खरी!
आत्ता, विद्युत तोरणे
तपासली तर बरी!

चमकवा, दागिने नि
देव्हार्‍याचे पाट, फळी!
उदबत्ती, उटण्याची,
साबणांची नामावळी !

◼️सौ. प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *