जिल्ह्यात मागील 24 तासात 165 कोरोनामुक्त 118 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात मागील 24 तासात 165 कोरोनामुक्त

118 नव्याने पॉझिटिव्ह दोन बाधितांचा मृत्यू

Ø आतापर्यंत 14381 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2505

Ø एकूण बाधितांची संख्या 17142

चंद्रपूरदि. 10 नोव्हेंबर : जिल्ह्यात गत 24 तासात 165 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 118 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये मुल तालुक्यातील चिखली येथील 55 वर्षीय पुरूष व वरोरा तालुक्यातील आनंदवन परीसर येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 256 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 240तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सातयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 118 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 142 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 165 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 381 झाली आहे. सध्या 2हजार 505 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 27 हजार 542 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 8हजार 860 नमुने निगेटीव्ह आले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 118 बाधितांमध्ये 68 पुरुष व 50 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 54पोंभुर्णा तालुक्यातील एकबल्लारपूर तालुक्यातील 9, चिमुर तालुक्यातील चार,   मुल तालुक्यातील तीनगोंडपिपरी तालुक्यातील दोन,कोरपना तालुक्यातील तीनब्रह्मपुरी तालुक्यातील एक,  नागभीड तालुक्‍यातील चारवरोरा तालुक्यातील9 ,भद्रावती तालुक्यातील 12सावली तालुक्यातील दोन,  सिंदेवाही तालुक्यातील पाचराजुरा तालुक्यातील चार तर गडचिरोली येथील पाच असे एकूण 118 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील जयराज नगरलालपेठ कॉलरी परिसरइंदिरानगरनिर्माण नगररयतवारीलक्ष्मी नगरवडगावबाबुपेठनगीनाबागऊर्जानगरपद्मापूरसुभाष नगरकोसाराघुगुसस्नेहनगरभिवापुर वॉर्डद्वारका नगरीतुकूमशक्तिनगरश्रद्धा नगरएकोरी वार्डसमाधी वार्डविद्यानगरलालपेठ कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मीबाई वार्डगोरक्षण वार्डमौलाना आजाद वार्डविसापूरकोठारीभिवकुंड नगरशिवाजी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सास्ती वार्डगौरी टाऊनशिपबेलमपूरचुनाभट्टी वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील जानी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील दत्त मंदिर वार्डजामणीआठमुर्डी,शांती नगरआनंदवन परिसरजिजामाता वार्डबोर्डा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील डिफेन्स चांदा परिसरविजासन रोड परिसरओमकार लेआउटसुमठाणा परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील नवरगावनाचनभट्टीमुरमाडी किन्ही भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील विद्यानगरवलनीगोवर्धन चौक परिसरप्रगती नगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील बसस्थानक परिसरसाई नगरी भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील ताडाळावार्ड नंबर 14 परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील तुकडोजी नगरआवारपूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील सोनापूरभागातून बाधित पुढे आले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *