◼️ काव्य रंग : स्वल्पविराम

स्वल्पविराम

थोडी विश्रांती घेण्यास
लेखनाला हवा आराम
विचारांचे बंध जुळण्यास
उपयोगी तो स्वल्पविराम ॥

आशय सांधतो समर्पक
व्याकरणातील हा बिंदू
वापरावा कोठे नेमके
यासाठी चक्रावतो मेंदू ॥

घेता स्वल्पविराम वाढते
सौंदर्य भाषा अभ्यासाचे
स्वल्पविरामाशिवाय गौण
ठरती नियम लेखनाचे ॥

चुकून रुसला फुगलाच हा
तर आशय पुरता बदलवी
योग्यस्थानी विराजमान
होता वाढे याची थोरवी ॥

जीवनातही योग्य वेळी
स्वल्पविराम अवलंबावा
विकासाच्या दृष्टीने तोच
समजावा सार्थ मागोवा ॥

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज) उस्मानाबाद
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *