◼️ काव्यरंग : स्नेहवेल

स्नेहवेल

मनामनात करूया
बीज पेरणी स्नेहाची,
खत पाणी घालू त्याला
हळूवार माया ममतेची!

येई बहर वेलीला
पाने आणि फुलांचा
अंगणात पडेल सडा
आप्तेष्ट स्नेहीजनांचा !

येता आपुलकीचा वारा
डोलेल धुंदीतच न्यारी
पाहता स्नेहवेली कडे
वाटेल किती ती प्यारी!

हळूवार स्पर्श करा हो
तुटतील फांद्या पाने
हरवून जाई मग ते
जीवनातीलच गाणे !

बहरू द्या नात्यांना ही
नको कशाचेच बंध
करी मुक्तपणे संचार
येवो मंदमंद सुगंध !

करा जपणूक नात्यांची
अलगद प्रेम द्या त्याला
मग स्नेहवेल पहा कशी ती
भिडेल ऊंच आकाशाला !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *