जिल्ह्यात मागील 24 तासात 168 कोरोनामुक्त : 103 नव्याने पॉझिटिव्ह ; एका बाधिताचा मृत्यू

जिल्ह्यात मागील 24 तासात 168 कोरोनामुक्त

103 नव्याने पॉझिटिव्ह ; एका बाधिताचा मृत्यू

Ø आतापर्यंत 14675 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2443

Ø एकूण बाधितांची संख्या 17378

चंद्रपूर, दि. 12 नोव्हेंबर : जिल्ह्यात गत 24 तासात 168 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 103 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यांमधील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 260 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 243, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली आठ, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 103 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 378 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 168 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 675 झाली आहे. सध्या 2 हजार 443 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 28 हजार 831 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 9 हजार 993 नमुने निगेटीव्ह आले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 103 बाधितांमध्ये 61 पुरुष व 42 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 38, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमुर तालुक्यातील पाच,   मुल तालुक्यातील दोन, गोंडपिपरी तालुक्यातील सहा, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील सात,  नागभीड तालुक्‍यातील तीन, वरोरा तालुक्यातील सात ,भद्रावती तालुक्यातील 19, सिंदेवाही तालुक्यातील पाच, राजुरा तालुक्यातील चार तर गडचिरोली येथील एक असे एकूण 103 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील जलनगर, स्नेहनगर, गणपती वार्ड, गंज वार्ड, दुर्गापुर, पठाणपुरा, संजय नगर, स्वावलंबी नगर, श्रीराम वार्ड, जटपुरा वार्ड, बापट नगर, बाबुपेठ,तुकुम,निर्मल नगर, रयतवारी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील महाराणा प्रताप वार्ड, सरदार पटेल वार्ड, भगतसिंग वार्ड, रविन्द्र नगर परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेरी, मोटेगाव, गुरुदेव वार्ड भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर 11, पिंपरी दीक्षित परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शिवाजी वार्ड, तळोधी, वार्ड नंबर चार, वार्ड नंबर 13 भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगर, पेठ वार्ड, देलनवाडी, शांतीनगर, विद्यानगर, फॉरेस्ट कॉलनी परिसरातुन बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील नवखळा, तळोधी भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील पिंपळगाव, आनंदवन परीसर, बोर्डा, राम मंदिर वार्ड भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॅम्प, बंगाली कॅम्प, भोज वार्ड, गौतम नगर, विजासन, गुरूनगर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.राजुरा तालुक्यातील रामपूर, साईनगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *