◼️ चारोळी :- दिवाळी रंग

 दीपावली

_१) चारोळी क्रमांक – [ १ ]_

रंगीबेरंगी फुलांचे तोरण सजले आपल्या दारी,
सुगंधी उटण्याने अभ्यंगस्नानाची मज्जाच न्यारी;
दीपावलीक्षणी लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळो दुनिया सारी,
सुख-समृद्धी घेऊनी नांदो लक्ष्मी सर्वांच्याच घरी.

_२) चारोळी क्रमांक – [ 2 ]_

आयुष्याच्या अंगणी पडो लक्ष दिव्यांचा सडा,
उठण्याचा सुगंधी दरवळ असो प्रत्येकाच्या घरा;
सुखी-समृद्धी आरोग्यमय जीवनाचा ध्यास मनी धरा,
दीपावलीच्या क्षणी लक्ष्मीपूजनाचा हाच अर्थ खरा…

कवी-श्री.दीपक सुरेश सहाणे सर.
संचालक-यशराज अकॅडमी,नाशिक.
संपर्क-8378937746

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *