◼️ काव्यरंग : दारावरून माझ्या..

दारावरून माझ्या…..
————————–

दारावरून माझ्या निघून जाते दिवाळी.
घरात माझ्या कधी येत नाही ती दिवाळी .

लावण्या नाही दिप ,नाही दोन थेंबही तेल,
तरीही आशा वाटते, येईल घरात दिवाळी .

अंधार दाटला आत,चूल केव्हाच झाली थंड ,
नैवेद्य काय दाखवू?रूसेल माझ्यावरी दिवाळी.

लक्ष लक्ष तारे नभी,अंधार परी दाटला अंतरी,
माझ्या आभाळात कधी उजळणार दिवाळी?

रडते मुक्याने मन माझे ,दाबून हुंदक्यांना,
हसत राहू कसा मी? मागे फिरली दिवाळी.

◼️ ✍️रामचंद्र राशिनकर
अहमदनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *