◼️ काव्यरंग : आली दिवाळी

आली दिवाळी

दिवाळी आली बघा
स्वच्छतेचा मंत्र ध्यानी ठेवा
प्रकाशाने घर झगमगवा
फराळाची मेजवानी मेवा

बांधू तोरण दाराला
रांगोळीचा असे मान
धन्वंतरीची पूजा करू
यमदीप दान महान

नरकासुराचा वध केला कृष्णाने
दृष्ट भावना दूर ठेवा
उटणे लावून अभ्यंगस्नान करून
महान शुभारंभ करा

लक्ष्मी आली घरी
सोनपावलांनी खास
धन-दौलत ची करतात पूजा
नव रंगाचा असे वास

बलिप्रतिपदेला असते
गोवर्धन पूजेचा साज
गायी खेळवितात या सणाला
नैवेद्य देतात आज

भाऊबीजेला भाऊराया ला
ओवाळीते बहीण औक्षवाण
भाऊ रक्षितो बहिणीला
भेटवस्तूंची असे देवान-घेवान

◼️✍️ सौ.भारती दिनेश तिडके
गोंदिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *