◼️ काव्यरंग : आली दीपावली

आली दीपावली

_[ गजल काव्य ]_

आली दीपावली ही रंग नाना उधळित …
लोक घरे सफाई कामी सारे दंग केले !१!

आधी गोवत्स द्वादशी पूजा गाई वासरे …
भूत दया पाळा तुम्ही फटाके का फोडिले !२!

यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मोठा …
वाढू नये प्रदुषण पाहिजे बंद केले !३!

दिन हा धन्वंतरी कडू पाल्याचा प्रसाद …
खाता जंतू होती ठार ते रोगराई गेले !४!

रंग रंगुल्या घरा बघत रमा येईल …
होता आवाज कर्णकटु ते देवही भेले !५!

सांगे नरक चतुर्दशी स्नान तन मना …
दीप लावा शौचालयी जे आज स्वच्छ केले !६!

वंदु या शेतकरी येता बलि प्रतिपदा …
आहे पोशिंदा विश्वाचा ज्याने हे कष्ट केले !७!

घरा आली बहीण भाऊबीज तया माना …
नाते पवित्र हे चालो सदा ‘कृगोनि’ बोले !८!

कविराज – ‘कृगोनि’ –
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
मु. पोटेगावरोड, पॉवर स्टेशनच्या मागे,
गडचिरोली, जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.
ईमेल – krishnadas.nirankari@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *