दिवाळी दिवाळं काढून गेली
सण प्रकाशाचा हा वर्षातला
दिवाळी आम्ही साजरी केली
ऋण सावकाराचं डोईवरतीप
दिवाळी दिवाळं काढून गेली
महामारीने जीव हा नकोसा
बेरोजगारीने झालो सारे त्रस्त
केली साजरी दिवाळी तरीही
नटलो सजलो फिरलोच मस्त
सावट पसरलेय अशा रोगाचे
दिवाळीतच दु:खी आहेत सारे
कधी होईल मुक्तसंचार सर्वत्र
घुमूदे सगळीकडे सुखाचे वारे
अवकाळीने या बळीराजाच्या
केला उभ्या पिकांचा असा घात
हाती नाही आमच्या पैसापाणी
कशी करावी मग खर्चावर मात
काळ दैन्याचा खूप सोकावला
कसे मिळावे कष्टाचेही फळ
माणुसकीच्या नात्याच्यामूळे
काढतो बळीराजा आता कळ
◼️सौ.भारती सावंत, मुंबई
9653445835