◼️ काव्य रंग :- पणती होऊ या ◼️✍️सदस्य मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि.१४/११/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘शनिवारीय काव्यस्तंभ‘ स्पर्धेतील ‘पणती होऊ या’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना.

पणती होऊ या

पणती होऊ या
प्रकाश देऊ या
ज्ञानाचा दिवा हा
घरोघरी लाऊ या !!

प्रेमाचे हे बंध
घट्ट बांधू या
नाते प्रेमाचे हे
जपूनची ठेऊ या !!

आनंद देऊ या
आनंद घेऊ या
आनंदाचे क्षण
वारंवार पाहू या !!

पणती होऊ या
जपून ठेऊ या
अंधार असता
प्रकाशीत होऊ या !!

पणती होऊ या
अंगणी तेवत
उजळत राहू
अंगण उजळू या !!

सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे (झेंडे)
म्हसवड नं 2
कुकुडवाड ता माण जि सातारा
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.
🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️
पणती होवू या

आधाराची घट्ट जोड अन्
ममतेचा ओलावा जपू या
आशेची नवंकिरण देणारी
इवलीशी पणती होवू या//धृ//

दाटलाय चोहीकडे आज
एकाकीपणाचा अंधकार
पातक कर्मांनी जगती या
माजलाय खूप हाहाकार
घाबऱ्या जीवास विसावा
अन् प्रेमाचा हात देवू या
विश्वासाने व्यक्त होणारी
इवलीशी पणती होवू या //१//

समतोल ढासळलाय इथे
कोवळ्या भाव भावनांचा
मुक्त,निर्भय संवादावाचून
घसारा होतोय नात्यांचा
दुभंगलेल्या काळजाच्या
मानवाला एकत्र आणू या
मुखी हास्य फुलविणारी
इवलीशी पणती होवू या//२//

माझं माझं करता करता
थोडं समाजाचं देणं फेडू
स्वार्थात गुरफटलेल्या या
निद्रीस्त मनाची तार छेडू
माणुसकीचे कमळ पुष्प
हृदयजलाशयी रूजवू या
प्रीत सुगंध दरवळणारी
इवलीशी पणती होवू या//३//

जात,पात,धर्म,पंथ,भाषा
खूप ओढल्या लक्ष्मणरेषा
‘माणसातला माणूस’ हीच
ओळख नवीन पटवू देशा
झुळूक बनून स्वयंप्रेरणेची
लुप्त संवेदना जागवू या
अंतरी हळूवार स्पर्शणारी
इवलीशी पणती होवू या//४//

झाले गेले विसरून सारेच
एकमेकांस देवू आलिंगन
क्लेश अवघे सारूनी दूर
सजवू सप्तरंगी हृदयांगण
जीवन आनंदीत करणारे
सुगंधीत अत्तर शिंपडू या
मना प्रफुल्लित करणारी
इवलीशी पणती होवू या//५//

मीता नानवटकर नागपूर 
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️
पणती होऊ या…!

पसरेल जरी निशा काळोखी
तम दुःखाचा पसरेल जीवनी
मिणमिणत्या ज्योतीसम तव
आपणही कधी उजळू या….
अंधःकारावर मात करेल अशी
इवलीशी पणती होऊ या…..

सुखदुःखाचे जाळे विणे भाग्य
त्या जाळ्यावर कर्मकर्तव्याची
मनासारखी नक्षी गुंफत जाऊ
नक्षीदार ते आयुष्य उजळण्या
अंधःकारावर मात करेल अशी
इवलीशी पणती होऊ या……..

उजळून जाऊ आपले आपण
पण हुरळून न जाणार कधी…
डोह परदुःखाचा शोधून जगी
त्या डोही आनंददीप सोडू या
अंधःकारावर मात करेल अशी
इवलीशी पणती होऊ या……..

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर ,चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह
🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥☄️🔥

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *