ढग काळे
काळे ढग नभांमधूनी
आले वाजवत नगारा
धडामधूम हा आवाज
जणू फुटलाय फुगारा
बेडकांचे डराव डराव
संगीतही झालेय सुरू
मुसळधार या पावसाने
तलावही लागलेत भरू
सौदामिनीनेही लख्कन
केलीच नभांत रोषणाई
सुशोभित करता रांगोळी
भ्यायली घरांघरात आई
पावसाच्या जलधारांनी
पाठवल्यात रुपेरी तारा
अवचित भणाणला हा
थंडगार भरार रानवारा
मुलांना वाटलीच मजा
सोडल्या पाण्यात नावा
जाऊ लागताच तळाला
केला मग ईश्वराचा धावा
काळोखले नभांगण सारे
पेटून उठले विजांचे दिवे
अंगणातुनी लखलखीत
पणत्यांचे प्रखर काजवे
सौ. भारती सावंत, मुंबई
9653445835