काव्यसंवेदनाचे प्रकाशन व कवी संम्मेलन २५ रोजी

काव्यसंवेदनाचे प्रकाशन व कवी संम्मेलन २५ रोजी

औरंगाबाद: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर तर्फे ‘काव्यसंवेदना’ दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आणि निमंत्रितांचे कवीसम्मेलन बुधवार दि. २५/११/२०२० रोजी,
मसिहा हाॅल, मोरे चौक, बजाजनगर (वाळूज) औरंगाबाद याठिकाणी सकाळी ११.००ते दुपारी ४.०० यावेळेत संपन्न होत आहे. यंदा हा मान औरंगाबाद शहराला देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक श्री. दादा गोरे औरंगाबाद हे असून, प्रमुख अतिथी म्हणून, डॉ. बबन नाखले नागपूर, डॉ. पद्माताई वाखुरे जाधव औरंगाबाद, श्री. गेणू शिंदे औरंगाबाद, श्री. राहूल कोसंबी औरंगाबाद, श्री. गणेश घुले औरंगाबाद, श्री. श्रीराम पोतदार औरंगाबाद, श्री. विजय शिर्के औरंगाबाद, तसेच मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष व काव्यसंवेदनाचे संपादक श्री. राहुल पाटील नागपूर, मुख्य सहसंपादक सौ. सविता ठाकरे पाटील सिलवासा, आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

या समारंभात काव्यवाचनात सहभागी मराठीचे शिलेदार समूहातील उपस्थित कवीकवयित्रींचा तसेच इतर नवोदितांचा संस्थेतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. करिता समूहातील सभासदांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक श्री. विष्णू संकपाळ औरंगाबाद, श्री. नितीन तुपलोंढे औरंगाबाद, संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील श्री.अरविंद उरकुडे नागपूर, श्री. अशोक लांडगे नेवासा यांनी केले आहे.

या प्रकाशन समारंभ व कवी संमेलनात नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा
९०११९९९७३७ किंवा ८८०५०१५७७१.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *