◼️काव्यरंग : खेळ मांडला

खेळ मांडला

खेळ मांडला मनाने
मनाशीच रुसण्याचा
कधीतरी वाटे त्याला
संप व्हावा विचारांचा ॥

विचारांचा ताळमेळ
कुठवर साधायचा
मनावर नियंत्रण
कितीकाळ ठेवायचा॥

मना तूच सांग मला
मंत्र ताबा ठेवण्याचा
स्वैर विचारमंथन
विषयच आवडीचा ॥

बंधमुक्त राहुनिया
घेत असे भरारी तू
क्षणभरी जाशीलच
बांधण्यास जलसेतू ॥

कधी राऊळी भजन
कधी बागेत विहारी
कधी दिल्ली दरबारी
मना,नाना चमत्कारी ॥

खेळ रुसण्याचा बंद
करशील ना रे आता
सारा तुझ्या मनातील
विचारांचा आहे गुंता ॥

◼️दत्ता काजळे (ज्ञानाग्रज) उस्मानाबाद
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *