◼️ काव्यरंग :- निसर्गाची रंगपंचमी

निसर्गाची रंगपंचमी

आल्या सरीवर सरी
चिंब पावसाच्या धारा
सळसळली ही पाने
झोंबे अंगाला की वारा!

गर्द हिरवी पोपटी
तरू गवताची पाने
चराचरातच घुमे
जणू चैतन्याचे गाणे!

लाल पिवळी ती फुले
उधळती गंध किती
त्यांचा मोहक सुवास
झाली गंधित ही माती!

शुभ्र प्राजक्ताच्या कळ्या
पडे भूमीवर सडा
निशिगंध रातराणी
सवे मोहरे केवडा!

निळी जांभळी केशरी
फुले डोलती झोकात
मोर मनीचा श्रावण
करी वर्षाव थाटात!

सप्तरंगी इंद्रधनू
आले नभात रंगून
निसर्गाची पंचमी ही
गेली रंगात न्हावून !

निळ्या नभांगणी भासे
छान पक्ष्यांची तोरणे
अहंकारी मानवाच्या
फेडी डोळ्यांची पारणे!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *