जिल्ह्यात गत 24 तासात 285 कोरोनामुक्त : 199 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

जिल्ह्यात गत 24 तासात 285 कोरोनामुक्त : 199 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

Ø  आतापर्यंत 16,910 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,780

चंद्रपूर, दि. 23 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 285 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 199 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 18 हजार 977 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 16 हजार 910 झाली आहे. सध्या एक हजार 780 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 43 हजार 547 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 19 हजार 486 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी येथील 29 वर्षीय पुरूष व माता मंदिर वार्ड वरोरा येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 287 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 267, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *