!!..भारतीय संविधान..!!
भारतीय संविधान हे एक
मानवतेचे गीत संगीत आहे
सर्व धर्मासाठी धर्मनिरपेक्ष
सर्वांना समान संधी आहे..!1!
संविधानाच्या या कायद्यात
स्वातंत्र्य,समता,बंधुता आहे
या भारतीयांना दिलेली एक
न्याय हक्काची भेट आहे..!2!
आपला परका गरीब-श्रीमंत
ईथे सर्वांनाच न्याय हक्क आहे
स्वातंत्र्याची धगधगती मशाल आहे
इथे न्यायाची मशाल आहे..!3!
तुमच्या माझ्या सर्वांसाठी
संविधानाचा हा कायदा आहे
सर्व जगाने आदर्श घ्यावा
असी लेखणीची धार आहे..!4!
संविधानात सर्वांचे हित आहे
ईथे ना जातिभेदाचा वास आहे
ना गरीब श्रीमंताचा दास आहे
न्याय हक्काचा विश्वास आहे..!5!
स्त्री पुरुषांसाठी समान हक्क जगण्या-मरण्याचा आधार समान हक्क जगण्या-मरण्याचा आधार आहे
संविधान हे पूजनीय आहे
संविधान हे वंदनीय आहे..!6!
संविधान गौरव ग्रंथ ग्रंथ आहे
संविधान निर्माते विश्वरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना
शिवकवी शिवश्री अडसूळ पाटील
यांची त्रिवार क्रांतिकारी वंदना आहे..!7!
◼️शिवकवी शिवश्री बाबुरावजी
अडसूळ पाटील “संभाजी ब्रिगेड”
मा. जिल्हा संघटक संभाजी नगर औरंगाबाद मो.93 25 29 41 98 98