◼️ काव्यरंग : तुळस माझ्या अंगणी

तुळस माझ्या अंगणी


तुळस माझ्या अंगणी
शोभून दिसते फार
तिला पाहताच सकाळी
दुःख पळून जाते पार

सकाळ-संध्याकाळ तेवतो दिप
जिवापाड जपते सौभाग्याचे लेण
सडा रांगोळी काढून चांगली
अंगणी मात्र शोभते तुळशीवृंदावन

पूजा पाठ नित्य करावे, पाया पडावे
तुळस देते ऑक्सिजन चोवीस तास
तुळशीस मनोभावे वंदावे
लक्ष्मी चा घरात असतो वास

आयुर्वेदात तुळशीला
महत्व फार आहे छान
कफ, सर्दी-पडसे दूर होते
आजीबाईचा बटवा असतो महान

कार्तिक महिना येतो तेव्हा
तुळशीचे कृष्णाशी लग्न लावतात
पावन होते भक्तिमय वातावरण
त्यानंतर वर वधूचे लग्न संस्कार होतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *