जिल्ह्यात चौघांचा मृत्यू ; 168 नव्याने पॉझिटिव्ह : गत 24 तासात 167 कोरोनामुक्त

जिल्ह्यात चौघांचा मृत्यू ; 168 नव्याने पॉझिटिव्ह : गत 24 तासात 167 कोरोनामुक्त

Ø  आतापर्यंत 17,540 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,693

चंद्रपूर, दि. 27 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात चार कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला असून 168 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर 167 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 526 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 540 झाली आहे. सध्या एक हजार 693 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 47 हजार 558 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 23 हजार 975 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये वरोरा शहराच्या शिवाजी वार्डातील 64 वर्षीय पुरूष व गांधी वार्डातील 69 वर्षीय पुरूष, भद्रावती शहरातील पंचशील नगर येथील 72 वर्षीय पुरूष तसेच नवेगाव ता. अहेरी जिल्हा गडचिरोली येथील 84 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 293 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 271, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 13, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *