महात्मा फुले
सत्यधर्म महात्मा फुले
शेतकऱ्यांचा आसूड जोतिबा
गुलामगिरीतुन अखंड प्रकाशणारे
स्त्री प्रवर्तक क्रांतिसूर्य ज्ञानोबा !!
स्त्री शिक्षणाची आग्रही मुर्ती
सावित्रीला प्रोत्साहित क्रांतिज्योती
ज्ञान दिप लाविला पुणे माहेर घरा
मती निती सुधारक विद्यादीश्वरा !!
ब्राम्हणाचे कसब ग्रंथ लेखकू
देवमाणसाचा सदाचार ऐकू
घ्या रे हाती पुस्तक लेखणी
चुल मुल देऊ फाटा कलाटणी !!
देह झिजविला तुम्ही
नारी सक्षमीकरणासाठी
स्त्री शिक्षण आत्मा पुजारी
शाळा उघडली मुलींसाठी !!
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
◼️प.सु. किन्हेकर, वर्धा
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह