◼️काव्यरंग :- माझे जोतिबा

माझे जोतिबा

स्त्री शिक्षणाचे प्रणेते
बहुजनांचे नेते
आम्ही गातो गीते ज्यांचे
महात्मा फुले नाव त्यांचे

सावित्रीला शिकवलं
आद्य शिक्षिका बनविलं
सुरुवात झाली स्त्री शिक्षणाची
बहुजन समाज उद्धाराची

केला विरोध मनुस्मृतिचा
अनिष्ट रूढी परंपरेचा
विधवा पुनर्विवाह घडवून आणला
जगण्याचा एक सन्मान दिला

बेघर झाले तरी ना थांबले
समाज विकासात दोघेही रमले
जोतिबा माझे क्रांतीसूर्य झाले
जीवन आमचे प्रकाशमय केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *