◼️ काव्यरंग :- बहरली सांजवेळ

बहरली सांजवेळ

बहरली सांजवेळ प्रसन्न
प्रीतीचा सुटला गार वारा
सूर्यास्त ची लाली असावी
हर्षा चा नाद असावा सारा

पक्षी जाती घरट्या वापस
गाई गुराखी येती घरी
निसर्गात चैतन्य फुले
आकाशी केसरी रंग पसरे वरी

प्रेमाच्या गाठी फुलेल
उष:काल होईल सुंदर आज
संध्याकाळच्या आठवणी
रमणीय मोहरेल साज

शांत रम्य वातावरण
निसर्ग फुलतो हिरवळीने छान
मंद मंद धुंद वारा वाहतो
सांजवेळेची उधळण महान

अल्हाददायक ती संध्याकाळ
आठवतोय तुझा तो स्पर्श
साथ तुझी नि माझी बहरून यावी
मनी आनंदाचा तो वर्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *