नाते रक्ताचे नव्हे प्रेमाचे
भावा बहीणीचे हे नाते
रक्ताचे नसले तरी प्रेमाचे आहे
रेशमी बंधातला हा गोडवा
नात्यात नसावा कधी रूसवा
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
साथ लाभावी या नात्याची
मरतानाही फुले हसत रहावी
तुझ्या प्रेमाची साथ असावी
दुरावा जरी अश्रुंनी दाटला
बंध हा आपला कधी न तुटावा प्रेमाच्या नात्याला मायेची ओल हवी
रक्षाबंधनाला राखी माझ्या हातावर सजावी
आठवणीतील हे स्वप्नीक क्षण
रूपेरी किरणानी सजावे
रेशमी साडीत तु अन्
शेरवाणीत मी कायम असावे
नाव-जयेश अजित उगले
ता-दिडोंरी जि-नाशिक ,मो-9420024809